मला वाटतं की एखाद्या गोष्टीवर ठोस पुराव्यावाचून ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. त्यामुळे माझी श्रद्धा तुम्हाला अंधश्रद्धा वाटू शकते. प्रत्येक धर्मात , समूहात अश्या विविध श्रद्धा (की अंधश्रद्धा?) जगभर आहेत. 
तुमचा मुद्दा आहे की जर मी माझ्या मर्जीने माझेच पैसे खर्च करून मंदिरात दान केले  काय किंवा एखाद्या संस्थेला भेट दिली काय इतरांनी त्यावर टीका करण्याचे काय कारण? हा मुद्दा बरोबर आहे कारण हा शेवटी तुमचा वैयक्तिक निर्णय आहे. 
पण मला वाटत की खरा प्रश्न हा समाजातील अनिष्ट प्रथांबद्दल आहे. जेव्हा तथाकथित बाबा आणि बापू लोक समाजातील गांजलेल्या लोकांचा गैरफायदा घेतात तेव्हा त्याला आळा घालणं हे समाजाचेच काम आहे. जर कोणी आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा दाखविल्या तर इतर धर्मातील का नाही दाखविल्या म्हणून ओरडण्यात काय अर्थ आहे? 
हिंदू म्हणजे अंधश्रद्धाळू असे समीकरण किंवा असा सार्वत्रिक समज आहे असे मला तरी वाटत नाही आणि पिके हा शेवटी एक चित्रपट आहे त्यामुळे त्यातला मुख्य संदेश घेऊन बाकी गोष्टी सोडून देणे योग्य नाही का?  . 
धन्यवाद!