त्याला त्या आकड्यांचा उच्चार साठवावा लागतो. "

हे निरिक्षण म्हणून योग्य असलं तरी मेंदू उच्चारापेक्षा प्रतिमा सुलभतेनं साठवतो ही वस्तुस्थिती आहे, म्हणजे एखादी व्यक्ती आपण पूर्वी पाहिली असेल तर ती पाहिली आहे याचा बोध होतो (प्रतिमा मॅच होते), पण नांव आठवत नाही. याचं कारणही तसं आहे, आपल्या मेंदूचा जवळजवळ ७०% भाग प्रतिमांनी व्यापला आहे. त्यामानानं श्राव्यस्मृतींची साठवण कमी आहे (१५ ते २०%) आणि बाकीचा भाग गंध, स्वाद आणि स्पर्शाच्या स्मृतींनी व्यापला आहे.  अर्थात, आपण दृष्टीचा सर्वाधिक उपयोग करत असल्यानं तशी परिस्थिती आहे.

जर आपण अंक दृष्यस्वरुपात साठवू लागलो (म्हणजे कॅलक्युलेटरचं की-पॅड डोळ्यासमोर आणून), तर ते सहज शक्य आहे आणि आठवायला सोपं आहे. म्हणजे तुमचा सेल नंबर 95520 असा दृष्टीच्या विज्युअल की-पॅडवर टाइप करा आणि मग 77615 हे अंक टाइप करा. तो संपूर्ण नंबर विज्युअल मेमेरीत सेव होईल आणि नंतर सहज आठवेल.