आपण सुचविलेली युक्ती चांगली आहे पण प्रतिमा साठविली तर प्रतिमाच चटकन आठवेल नंतर दुसऱ्याला सांगताना त्या प्रतिमेचे वर्णन (या केसमध्ये आकड्यांचा उच्चार) लवकर आठवणार नाही. तसेच अंक प्रतिमा स्वरुपात मेंदुत साठवत गेलो तर नंतर कधी अंकांची मनातल्या मनात गणिती आकडेमोड करावी लागलीतर ती देखील अवघड वाटेल.