मला वाटतं की एखाद्या गोष्टीवर ठोस पुराव्यावाचून ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा.
१- तुमची परीभाषा जरी बरोबर असली तरी अंधश्रद्धा या विषयावर विचार करताना इतकी काटेकोर परिभाषा उपयोगाची नाही. उदाहरणार्थ, होमियोपथी परीणामकारक आहे या बाबत कोणताच ठोस पुरावा नाही. तरी सुद्धा बहुतेक लोक (जे होमियोपथी वापरत नाहीत ते सुद्धा) होमियोपथीची गणना "अंधश्रद्धा" अशी करणार नाहीत.
२- मी अगदी सुरुवातीलाच लिहीले होते कि धर्म व अंधश्रद्धा हे वेगळे ठेवावेत. कारण "धर्म" यात भावना निगडीत असतात. एकाद्या व्यक्ती अमूक एक देवाची प्रार्थना/ पूजा करीत असेल वर त्या वर टीका केली तर ती व्यक्ती "माझ्या भावना दुखावल्या" अशी तक्रार करू शकते. पण लग्न विषयी निर्णय घेताना पत्रिका पाहण्या वर टीका केल्यास "भावना दुखावल्या" अशी तक्रार कोणी करणार नाही.
३- एकादे कृत्य हार्मलेस आहे म्हणून करू द्यावे, हे बरोबर नाही. जयललिथा किंवा सचिन तेंडुलकर यांचे मंदिर बांधून त्यांत त्यांच्या मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा करणे; "परीक्षेला अमूक एक शर्ट घालून गेल्यास मार्क चांगले मिळतात" असे वाटणे; झोपताना दक्षिणेला पाय न करणे; वगैरे सर्व हार्मलेस आहे. पण मूर्खपणाचे आहे, जनमानसात irrational विचार पसवणारे आहे, म्हणून त्याला विरोध केलाच पाहिजे.