जर कोणी आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा दाखविल्या तर इतर धर्मातील का नाही दाखविल्या म्हणून ओरडण्यात काय अर्थ आहे?

मान्य. पण आपल्या धर्मातील अनिष्ट प्रथा कश्या प्रकारे दाखविल्या ते महतवाचे आहे. मी पीके हा सिनेमा पाहिला नाही, पाहणार पण नाही कारण मुळातच मला सिनेमे आवडत नाहीत. पण त्यात ज्या काही सीन बाबत वाद आहेत, त्या सीन चा "स्वर" काय आहे ते महत्वाचे. जसे, मला कोणी म्हंटले  "तुझे वजन वाढले आहे" तर मी रागावणार नाही, उलट ते गंभीरपणे घेऊन  वजन कमी करण्यचा प्रयत्न करेन. पण तेच जर मला कुणी "ए ढोल्या" असे म्हंटले तर मी नक्कीच रागावेन.  स्वर महत्वाचा.