धर्म व अंधश्रद्धा हे वेगळे ठेवावेत - एकदम मान्य... हेच माझे म्हणणे आहे.
काही लोक एखादी विचित्र प्रथा "धर्माच्या" नावखाली खपवतात आणि धर्म बाद्नाम होतो.
आता रहिला हर्मलेस मुद्दा -
१. जयललिथा किंवा सचिन तेंडुलकर यांचे मंदिर बांधून त्यांत त्यांच्या मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा करणे- (मी व्यक्ती पुजेचा विरोधक आहे - पण तरिही ... ) काय हरकत अहे जर एखाद्याला/समुहाल त्या वक्ती विषयी आदर आहे आणि तो ते त्या पद्धतिने व्यक्त करत अहेत ? आपण नाही का गांधी चे फोटो नोटे वर/न्यायालयात/सरकारी कचेरीत लावतो...
बर्याच नेत्यांच्या समाधी स्थळाची जागा एखाद्या मंदिरा पेक्षा काही वेगळी नसते (राज घाट...)
२. परीक्षेला अमूक एक शर्ट घालून गेल्यास मार्क चांगले मिळतात" असे वाटणे - काय हरकत आहे? जर त्या कृतिने एखाद्याचे मनोबल उंचावत असेल तर? (एक सुंदर कथा आहे दुवा मिळालातर देइन - "एका माणसाला एक अति श्रीमंत माणुस भांडवल म्हणून मोठ्या रकमेचा चेक देतो पण तो माणुस चेक न वटवता त्या चेकच्या भरवश्यावर कष्ट कारून पुन्हा व्यापरात प्रगती करतो... जेव्हा तो श्रीमंत माणसाला न वापरलेला चेक परत करयला येतो तेव्हा त्याला कळते कि तो एक श्रीमंत माणुस नसून एक वेडा असातो व तो श्रीमंत असल्याचे सगळ्याना सांगत असतो..." तात्पर्य काय - मला उर्मी देणारी एखादी गोष्ट असेल ती मी मानली तर बिघडले कुठे? ह पण परीक्षेला अभ्यास न करता फक्त अमूक एक शर्ट घालून गेल्यास मार्क चांगले मिळतील असे कोणी म्हणाले नुसाती अंधश्रद्धा नाही तर शुद्ध वेडेपणा आहे...
३. झोपताना दक्षिणेला पाय न करणे - माझ्या मते वास्तुशास्त्र आणि तुमचे काहीतरी वाकडे आहे (क्रुपया वैयक्तिक घेउ नका...) पण या मागचे शास्त्र मला महित नाही (उत्तर/दक्षिण ध्रुव वरील चुंबकिय तत्त्व वगैरे ... असे एकले आहे - अर्थात मी फारसे मनावर घेताले नाही अजून ते ) पण हे हिंदुच नाही तर फेंग्शुइ प्रकारात सुद्धा एकले आहे...
त्यामुळे केवळ विरोधाला विरोध नको ... माझ्या मागील प्रतिसादात म्हणल्या प्रमाणे सकाळी प्रार्थना म्हणणे किन्वा गाणे म्हणणे या पैकी काहिही म्हणल्याने माझा दिवस चांगला जात असेल तर "प्रार्थना म्हणणे" म्हणजे अंधश्रद्धा का?
तुम्हाला माहिती असेल हि कदाचित - १३ क्रमांक हा युरोपात आणि अमेरिकेत (म्हणून आता अपल्याकडे सुद्धा) अशुभ मानतात... १३ तारिख आणि ती सुद्धा शुक्रवारी आली तर अजून भीती ) डब्लु. टि. सी. मध्ये १३ वा मजला नाही आता काय बोलायचे ...