लेख अतिशय आवडला.
यावरून मला वि. वि. बोकील यांची १४ एप्रिल किंवा अशाचा काहीतरी नावाची कादंबरी आठवली. कादंबरीत अनेक नायक आणि नायिका आहेत. प्रत्येकाची एक वेगळीच आणि स्वतंत्र कहाणी आहे. प्रत्येक प्रकरणात एक अशी काही स्थिती उत्पन होते की त्या अडचणीचे निराकरण होण्याचा काहीही मार्ग दृष्टिपथात नसतो. या विविध नायक-नायिकांच्या जोड्यांचा इतर जोड्यांशी काहीही संबंध येत नाही. त्यामुळे वाचकाचे कुतूहल वाढतच जाते. ही जोडपी मुंबईतील बंदरभागात असलेल्या एका हॉटेलमध्ये मुक्कामाला येतात, आणि गोदीतल्या आगबोटीत झालेल्या स्फोटांमुळे उसळलेल्या आगडोंबात भस्मसात होतात; त्यांच्यासमोरील अडचणी आपोआप दूर होतात.
वर लिहिलेल्या लेखात तीन स्वतंत्र, एकमेकांशी दूरान्वयानेही संबंधित नसलेल्या घटना आहेत, पण तिघांपासून एकच सामाईक निष्कर्ष निघतो आणि कथा-पात्रांच्या अडचणी दूर करतो!