माझ्या मते वास्तुशास्त्र आणि तुमचे काहीतरी वाकडे आहे अगदी १००% आहे. केवळ वास्तू हेच नहे तर फेंगशुइ, रेकि, इत्यादी सर्वांचे मला वाकडे आहे.

पण या मागचे शास्त्र मला महित नाही 
   आणी तरीही ते "शास्त्र" आहे हे तुम्हाला मान्य आहे.

झोपताना दक्षिणेला पाय न करणे - (उत्तर/दक्षिण ध्रुव वरील चुंबकिय तत्त्व वगैरे ... असे एकले आहे)
. जर चुंबकीय क्षेत्राचा काही परिणाम असता, तर तो फक्त भारतात हिंदूंवरच नव्हे तर सर्व धर्म सर्व प्रांत - सर्वांवरच त्याचा प्रभाव पडायला पाहिजे. मनुष्यच कशाला, प्राण्यां वर पण त्याचा प्रभाव पडायला पाहिजे. पण तसे नाही. इतर कोणत्याही धर्म/ देशातील लोकांना दक्षिणे कडे पाय करून झोपल्यास काहीही त्रास नाही. (त्रास भारतातील हिंदूंना पण नाही. मात्र त्यांना  तसे सांगायला गेल्यास ते "पण त्यात हार्म काय" असे विचारतात.)

परीक्षेला अमूक एक शर्ट घालून गेल्यास मार्क चांगले मिळतात" असे वाटणे - काय हरकत आहे?
काहीही हरकत नाही, मात्र तुम्ही तुमच्या शब्द कोशातून "irrational" हा शब्द काढून टाका.