म्हणजे पक्ष्याला इतक्या अनंत आसमंत भ्रमणानंतर सुद्धा त्याच्या घरट्याचा मार्ग 'दिसतो'.  प्राण्यांना भक्ष्याचा माग गंध आणि दृक (ते अर्थात निसर्गाचं काम आहे) माध्यमातून गवसतो. इतर सजीवसृष्टीकडे वाक संवेदना केवळ ध्वनीपुरती मर्यादित आहे (ती देखिल भूक, प्रणय आणि भय (डिस्ट्रेस कॉल) या पुरतीच). माणूस शब्दात गुंतल्यामुळे त्याची दृक संवेदना क्षीण झाली आहे.