माझ्या मते हिंदू धर्म आणि भारतातील प्रथा या समजण्यात काहितरी गल्लत होते आहे... 
संस्कृत मधिल साहित्य आणि भगवे कपडे घातलेल्या व्यक्तीने एखाद्या विचार/प्रबंध मांडला (आणि कदाचित भारत हिंदू बहुल असल्यामुळे)काही हिंदू लोकांनी तो आचरणात आणला म्हणजे ति हिंदुची "अंधश्रद्धा" असा गैरसमज होणे सहाजिक आहे. 
याचेच उदाहरण म्हणजे - योगासने, आयुर्वेद, वास्तू या गोष्टी भगवे कपडे धारण करून प्रवचन देणार्या "बाबा/मातांनि" प्रवाचनासोबतच्या "बाय प्रोडक्ट (सह उत्पादने) म्हणून विकायला / प्रचार करायाला सुरुवात केली आणि त्या गोष्टीपण न कळत "हिंद" (हिंदूनाहि) संस्कृती मधून "हिंदू संस्कृती" चा भाग समजल्या जाउ लागल्या...
जगात सगळिकडेच स्थानिकरितीरिवाज/ प्रथा असतात - काळानुसार बदलल्या नाहित किंवा न समजून घेता तर त्या तश्याच अचरणातआणल्या तर त्या "अंधश्रद्धा" प्रकारात मोडतात.

भुते/वाईट शक्ती आहे असे मानणे आणि मग त्या पासून वाचण्याचे उपाय शोधणे हे सगळ्या समाजात समान आहे... उगिच हिंदू अंधश्रद्धाळू म्हणू नका... (इतर धर्मातपण अंधश्रद्धा आहे म्हणून हिंदू धर्मातिल सर्व प्रथाचे मी समर्थन करत नाहि... )

तुम्ही दिलेल्या कोणत्याही उदाहरणाला मला धर्मात आधार सापडत नाहि, आणि त्या गोष्टी न पाळल्यामुळे मी हिंदू नाही हे कोणी बाबा/साधु सिद्ध करू शकत नाहि... पहिल्या दोन गोष्टी तर धार्मिक प्रथा प्रकारात नाहित (अधुनिक स्थापत्य अभियंते, याचा प्रचार करताना दिसतात, तसेच फेंग्शुइ मध्ये पण हा प्रकार आहे)

१: किचन, झोपायची खोली, पाण्याची टाकी इत्यादी कोणत्या दिशेला असावे हे कोण्या अ-वैज्ञानिक "शास्त्रा" प्रमाणे ठरविणे
२: झोपताना अमूक एका दिशे कडे पाय करणे किंवा न करणे
३: लग्न ठरविताना पत्रिका पाहणे
४: कोणतेही काम सुरु करताना मुहूर्त पाहणे
५: साडेसाती, ग्रह शांती वगैरे

http://en.wikipedia.org/wiki/Faith 

मी कोणतेही वास्तु/फेंग्शुइ वगैरे मानत नाहि आणि ते हिंदू धर्माचाच भाग आहे असे मी मानत नाहि... "वास्तुशास्त्र" हे प्रचलित नावआहे म्हणून मी तसे लिहिले - उद्या "कामशास्त्र" पण एका हिंदू ने लिहिले (आणि ईतर श्लोकां प्रमाणे संस्कृत मध्ये लिहिलेलेअसल्यामुळे) तो एक हिंदू धार्माचाच भाग आहे असे होत नाही

आता राहिला माझा "अमूक एक शर्ट " ... तुम्ही लग्नाच्या वाढदिवाशी तीने भेट दिलेला पाहिला शर्ट घालून जावा ... तुम्हालाही "मार्क चांगले मिळतील" - मी खात्री देतो - बाबा/महाराज नसून देखिल. शेवटी भावना महत्त्वाची - त्याचा अतिरेक नसावा इतकेच नाहितर "अतिरेकि"पणाचा धोका ... 

तुर्तास इतके लिहुन मी या विषयावर निरोप घेतो ...
(चर्चेत वैयक्तिक रोख आला असे वाटल्यास  क्षमस्व - तसा उद्देश नव्हता या विषयावर साधक-बाधक चर्चा व्हावी इतुकाच उद्देश...)

~ बंड्या