नेमाड्यांविषयी सर्वतोपरी आदर राखून असे म्हणावेसे वाटते की या गृहस्थांना सनसनाटी आणि बोचरी विधाने करायला आवडते. औचित्य वगैरे गेले खड्ड्यात. कालच (२३ जॅन.) रामदास भटकळांच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त एक कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. तिथे त्यांनी गाडगीळ, पाडगावकरांसारखे (फडतूस/लोकप्रिय )लेखक आणि इतर उच्च लेखक या दोघांची मोट भटकळांना कशी काय बांधली असेल आणि अशा वेगवेगळ्या दर्जाच्या लेखकांशी कसे काय जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले असतील, अशा अर्थाची विधाने केली. विनोदाच्या नावाखाली अशी 'टोचक' विधाने करणे ही त्यांची शैली आहे. विनायक म्हणतात त्याप्रमाणे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
त्यांचे सर्वच भाषण अशा वरवर विनोदी पण खरे तर आढ्यताखोर विधानांनी भरलेले होते.
पब्लिक मात्र या शेरेबाजीवर तुफान खूष होते.