अंनिस ने चूक केलेली नाही.

फक्त एव्हढेच की त्यांचे विचार सध्या लोकांना पटत नाहीयेत. कालांतराने ते पटतील. वर्तमानात अयशस्वी म्हणजे सदासर्वकाळ अयशस्वी असे नसते.

मार्गात येणारा एखादा मोठा खडक/शिळा/पहाड तोडायचा असेल तर पहिला घाव कुणीतरी घालतोच. त्या घावाने तो अडथळा दूर होत नाही पण हळूहळू तो दगड तुटत आला आणि पुढचा मार्ग दिसू लागला की लोक जोमाने आणि समूहाने त्यावर घाव घालतात आणि आपला मार्ग प्रशस्त  करतात.

शिवाय, सुरुवातीला जडत्वावर (इनर्शिया) मात करण्यासाठी अधिक शक्ती लागते पण एकदा का चाकाला गती मिळाली की अल्प शक्तीनिशी ते गरगरू लागते.