इथे ऐन आणीबाणीत भरलेल्या साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षा दुर्गा भागवत यांनी सेन्सॉरशिपची बंधने धुडकावून आणिबाणीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेल्या बंधनांचा, जयप्रकाश नारायणांच्या अटकेचा निषेध केला. सर्वच साहित्यिक सरकारच्या ताटाखालची मांजरे नाहीत असा खणखणीत इशारा इंदिराबाईंना दिला. ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याबद्दल तुरुंगवासही भोगला. 

त्यावेळेस आणीबाणीचा  जाहीर निषेध करणाऱ्यांमध्ये नेमाड्यांचे नाव वाचल्याचे आठवत नाही. खरे तर दुसऱ्या कुठल्याही मराठी साहित्यिकाने तसे केले नाही (अगदी पु. लं सकट). त्याबाबतीत दुर्गाबाई अपवादच.

विनायक