आपण उपस्थित करता.

आपल्या पहिल्या प्रतिसादातली ही वाक्ये.
८७८ किंवा १९६४ काळातल्या सम्मेलनांवर नाही. हल्लिच्या
साहित्य सम्मेलना वर टीका करणारे ते जे कोणी असतील (नांव उघड करायला काय अडचण होती ? ) ते एकटे नाहीत. अनेक वर्तमान पत्रातून अग्र लेखातून पण या वर भरपूर टीका होत असते. तेंव्हा साहित्य सम्मेलनाच्या हितचिंतकांनी ही वेळ का आली या वर विचार करावा.

तर दुसऱ्यातली ही वाक्ये.
साहित्य सम्मेलनातून नेमके काय साध्य होते, हे कोणी सांगेल काय?

आता इथे नेमकी कुठली संमेलने अपेक्षित होती? आजची की पूर्वीची?
यावर निदान एक महत्त्वाचे उदाहरण दिल्यावर आपण सरकारी पैशाच्या अपव्ययाचा मुद्दा तिसऱ्या प्रतिसादात काढलात.

पण साहित्य सम्मेलनाला करदात्याचा पैसा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रकारे खर्च होतो. प्रत्यक्ष - दशलक्षावधी रुपयांचे सरकारी अनुदान.  अप्रत्यक्ष - सम्मेलनाला सरकारी खर्चाने हजेरी लावणार्या मंत्र्यांचा प्रवास खर्च. म्हणून यातून काय साध्य होते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. साहित्यिकांनी त्यांच्या पैश्यातून दर आठवड्याला सहित्य सम्मेलन घ्यावे, माझी काहीच हरकत नाही.

नेमका विरोध कशाला आहे? साहित्य संमेलनामधून पूर्वी जश्या प्रबोधनाच्या, ज्ञानवर्धनाच्या गोष्टी व्हायच्या तश्या आता होत नसल्याने केवळ उत्सवी स्वरूप आले आहे त्याला? की करदात्याच्या पैश्याने साहित्यिक मजा मारतात त्याला? आज करदात्याचा कितीसा पैसा खरोखरी योग्य कारणासाठी खर्च होतो आणि किती पैश्याचा (भ्रष्टाचार वगैरेमध्ये) अपव्यय होतो? आणि तो थांबवण्यासाठी आपण किती आटापिटा करतो?
याचा अर्थ असा नाही की साहित्यिकांनी/साहित्यसंमेलनांवर झालेला अपव्यय सहन करावा. पण टीका करताना प्रमाणाचे भान असावे.