मुद्दा एकच आहे. १८७८ सम्मेलनात नेमके काय घडले त्याच्या किती नोंदी  आहेत मला माहीत नाही. पण भरपूर नोंदी असतील, किंवा अजिबात नसतील; तिथे साहित्य संबधित विषयांवर भरपूर चर्चा झाली असेल, किंवा अजिबात झाली नसेल, तरी आता ते सर्व इतिहास जमा झाले. त्यातून, साहित्य सम्मेलन म्हणजे इतकेही महत्त्वाचे नाही - जशी पानिपतची तिसरी लढाई - कि आपण "इतीहास" म्हणून त्याच्या कडे पाहावे व त्याचे विशलेषण करावे.

नेमाडे नेमके काय म्हणाले ते केदार यांनी लिहिले नाही (quote केले नाही) पण माझ्या कॉमेंटस अलीकडच्या काळातील सम्मेलनां पुरत्याच आहेत. आणी जनतेने या वर चर्चा करण्याची गरज आहे कारण यात सरकारी पैसा खर्च होतो. मी व माझे काही मित्र दोन तीन महिन्यातून एकदा एकच्या घरी जमून गप्पा कुटतो, बीयर पितो. पण हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे का नाही, हा मनोगत वर चर्चेचा विषय होऊ शकत नाही, कारण आम्ही हे सर्व आमच्या पैश्यातून करतो. आला फरक लक्षात ? काही वर्षां पूर्वी पुण्याच्या साहित्य सम्मेलनात माणिकचंद उद्योग समूहा कडून भरघोस मदत देऊ केली होती, पण अभय बंग व इतर काही लोकां कडून त्याला विरोध झाला - गुटख्याचा पैसा घेऊ नये. तेव्हां पण वर्तमान पत्रांतून ही टीका झाली होती - कि सम्मेलनात गुटखा खानारे, पींका टाकाणरे चालतात पण गुटख्याचा पैसा चालत नाही !! पण सम्मेलना तर्फे कोणी त्याचे उत्तर दिले नाही. करदात्याचा पैसा जेव्हां पण अपव्यय होतो, तेव्हां अशी टीका होतेच. जसे - ऑलिंपिक टीम मध्ये अधिकार्यांची गर्दी, सरकारी अधिकार्यांच्या / मंत्र्यांच्या परदेश वार्या, फडणवीस सरकारचा शपथ विधी, इत्यादी. यां वर जितकी टीका होते त्या मानाने साहित्य सम्मेलना वर झालेली टीका फार म्हणजे फारच सौम्य आहे. तरी पण
१- टीका करताना प्रमाणाचे भान कुठे सुटले हे कोणी सांगेल काय?
२ - हल्लीच्या साहित्य सम्मेलनातून नेमके काय साध्य होते, हे एकदा तरी कोणी सांगेल काय?