आजच्या काळात मोडी लिपीचे पुनरुज्जीवन शक्य आहे का? आहे. मोडी लिपी काही "लुप्त" झालेली नाही. पुनरुज्जीवन सहज शक्य आहे.
सध्या कोणकोणत्या क्षेत्रात मोडीचा वापर होऊ शकतो? अगदी कोणत्याही.
मराठीची लिपी मोडी केल्याने मराठीला निराळी उभारी मिळेल का? अजिबात नाही. मोडी हि केवळ लिपी आहे. मराठी ही भाषा आहे. भाषा आणी लिपी यांचा काहीही संबंध नसतो. कोणतीही भाषा कोणत्याही लिपीत लिहीता येते. इंडोनेशिया, मलेशिया वगैरे देशांनी त्यांची भाषा रोमन (इंग्रजी करता वापरतो ती) लिपीत लिहीण्याचा निर्णय घेतला. त्यांची वेगळी लीपीच नाही. त्याने त्यांच्या भाषेचे काहीही नुकसान झाले नाही. शेक्सपीयरची नाटके भाषा इंग्रजीच ठेवून देवनागरी लिपीत लिहीली तरी त्यांची मूळ आशय अबाधित राहील. पण मराठीत भाषांतर केले तर मात्र आशय बदलू शकतो, लिपी रोमन वापरली तरी. आले लक्षात ? हे मी जे उत्तर तुम्हाला लिहिले, मराठीत व देवनागरी भाषेत, ते मी लिहीत असतानाच संगणकात त्याचे बायनरी लिपीत "लिप्यांतर" होत आहे; तुमच्या पर्यंत ते बायनरी मधेच पोहोचणार आहे; व स्क्रीन वर ते परत देवनागरी लिपीत पण युनिकोड अक्षरे वापरून दिसणार आहे. त्याने काहीही फरक पडत नाही. पुन्हा एकदा, भाषा आणी लिपी यांचा काहीही संबंध नसतो.
शेवटी तुम्ही न विचारलेला प्रश्न - मराठीची लिपी मोडी केल्याने मराठीचा र्हास होऊ शकतो का? अगदी नक्कीच. सध्याची पिढी देवनागरी मध्ये मराठी वाचण्यास इंटरेस्ट घेत नाही, मोडी मध्ये तो इंटरेस्ट आणखीनच कमी होईल. मी सुद्धा वाचणे लिहीणे बंद करेन. मराठी मोडीत लीहीणे हा मराठी "मोडीत काढण्याचा"
खात्रीचा उपाय आहे.