मोडी लिपीत ऱ्हस्व इकार ि लिहिता येत नाही.
मोडी लिपीत के आणि लो ही अक्षरे सारखीच लिहिली जातात/दिसतात. (चिं. वि. जोश्यांच्या एका गोष्टीतला इतिहाससंशोधक "जहांगीरच्या शिपायांनी १६०० लोकांचा समाचार घेतला की १६०० केकांचा समाचार घेतला" हे शोधण्याच्या चिंतेत असतो.. ते आठवत असेल!)
अशा काही मर्यादा ऐकलेल्या आहेत. आणखीही असतील.
शिवाय ऍ ऑ इ. स्वर लिहिता येतात की नाहीत ते माहीत नाही.
त्यामुळे नव्या लेखनासाठी मोडीला बंदी करून देवनागरी सक्तीची केली ते योग्यच झाले असे मला वाटते.