'रिकामटेकडे' हा शब्द फारच म्हणजे फारच सौम्य आहे.
निर्लज्ज, मतिमंद आणि हलकट यांचा समुच्चय असलेला एकादा शब्द तयार करावा लागेल.
चेतन पंडित यांच्या वरच्या प्रतिक्रियांशी पूर्णपणे सहमत.
त्यांच्या शेवटच्या प्रतिक्रियेतल्या दोन प्रश्नांना अजून काही जोडः
३ - साहित्य संमेलनांचे धडधडीत अपहरण जेव्हा कौतिक ठाले टोळीने केले होते तेव्हा साहित्य संमेलने कशी उपयोगी आहेत याबाबत आत्ता बरळणारी मंडळी शेपूट घालून का बसली होती? सध्याच्या संमेलनाध्यक्षांची कौतिक ठाले टोळीबाबत काय भूमिका आहे?
४ - महाराष्ट्र साहित्य परिषदेने स्थापनेपासून आतापर्यंत साहित्यप्रसारासाठी किती उपक्रम राबवले, व त्याची फलनिष्पत्ती काय झाली? शब्दबंबाळ चर्चासत्रे भरवून बुभुक्षित सेमिनार सर्किटपंथियांचे खिसे व पोटे भरतात. पण त्याचा साहित्यप्रसारासाठी नक्की काय उपयोग होतो हे स्पष्टपणे मांडता येईल का?
५ - बहुतांश मराठी पुस्तकांची आवृत्ती एक हजाराची असते. अनेक दर्जेदार पुस्तकांच्या आवृत्त्या निघण्यासाठी वीस वर्षांहूनही अधिक काळ वाट पाहावी लागते. काही पुस्तके तर दशकानुदशके 'आउट ऑफ प्रिंट' असतात. या समस्येच्या सोडवणुकीसाठी साहित्य संमेलनातून काय कृती केली जाते? मुळात ही लाज वाटण्यासारखी समस्या आहे असे साहित्य संमेलनप्रिय मंडळींना मान्य आहे का? "प्रमाणाचे भान" ठेवून एक सूचना - साहित्य संमेलनासाठी खर्च होणारी सरकारी खिरापत जर अशा पुस्तकांच्या आवृत्त्या काढण्यासाठी वापरली तर दरवर्षी किमान पन्नास दर्जेदार पुस्तके वाचकांना उपलब्ध होऊ शकतील. {'दर्जेदार पुस्तके कशी ठरवावीत' हा फाटाप्रश्न येणार असेल तर त्यावर वेगळी चर्चा करता येईल}
६ - 'रिकामटेकडे' हा शब्द बराच झोंबलेला दिसतो. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय आहे? बरेच जण नावामागे 'प्रा' लावतात. ते कुठल्या महाविद्यालयात कुठला विषय शिकवतात, आणि त्या विषयाचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी काय करतात हे जर प्रसिद्ध केले तर दोहोंपैकी एक होईल. हा शब्द वापरण्याची वेळ येणार नाही वा या शब्दाला आक्षेप घेण्याचे कारण उरणार नाही.
७ - आतापर्यंत झालेल्या संमेलनाध्यक्षांच्या यादीकडे पाहिले (दुवा क्र. १ पाहा) तर आतापर्यंतच्या ९२ संमेलनाध्यक्षांपैकी फक्त चार स्त्री साहित्यिका या पदावर दिसतात. स्त्री साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान साडेचार टक्क्यांहून कमी आहे का?
प्रश्न अजून वाढवता येतील. पण खरी उत्तरे देण्याची हिंमत असणारे कुणी असेल तर त्याला काही अर्थ आहे.