आपल्यावर लहानपणापासून झालेल्या संस्कारांमुळे व आजूबाजूच्या वातावरणामुळेच आपली विचारसरणी अशी बनलेली आहे. ती घालवणं कठीण आहे. आपण सगळे हे जाणतो की परमेश्वर दिसत नाही तरीही त्याच्या नावावर चाललेली सगळी थेरं आपण सहन करतो. मग निर्गुण निराकार परमेश्वराची कल्पना मनात कशी पक्की होणार ? याला आपलं अध्यात्मही बऱ्याच अंशी जबाबदार आहे. तसच जितकी मतं तितके मार्ग असे आपल्या धर्माला मान्य असल्याने दुसऱ्याला तुम्ही "तुझे चाळे बंद कर" , असे आपण सांगू शकत नाही. याला एक उत्तर देता येईल. ते म्हणजे नुसती उपासना करून बरोबर अयोग्य दिशेत प्रयत्न करून माणसाला जीवन जगता येत नाही हे सप्रमाण सिद्ध करावे लागेल. तरच काहीतरी सुधारणा होण्याची शक्यता आहे. निदान आपल्या धर्मात दुसऱ्याचे मत भिन्न असू शकते ही सहिष्णुता तरी आहे , हे काय वाईट आहे ? अर्थातच आपल्या धर्माला इतर धर्मीय "सैल धर्म " असे म्हणतात. खरंतर आपण या धर्माचे आहोत याचं महत्त्व वाटायला हवं. अंधश्रद्धा या