ओसीआर वापरण्याची गरज नाही. मी हे उत्तर टाईप करत असताना की बोर्ड वर Ka टाईप करतो व स्क्रीन वर ते "क" दिसते, किंवा की बोर्ड वर tyA टाईप करतो व स्क्रीन वर ते "त्या" दिसते. रोमन की बोर्ड वर कोणते अक्षर टईप केल्यास देवनागरीत कोणते अक्षर येईल हे लक्षात ठेवण्यास मला अवघड जात असेल तर मी क, प, ब, इत्यादी अक्षरांचे स्टीकर छापून ते K P B इत्यादी keys वर चिकटवून "देवनागरी की बोर्ड" तयार करू शकतो. असे स्टीकर पूर्वी मिळत असत. तर, मोडीच्या अक्षरांचे स्टीकर बनवून ते एका की बोर्ड वर चिकटवायचे. हा "मोडी की बोर्ड" तयार झाला. एक टाईप करणारा/ करणारी मोडीतील कागद शेजारी ठेवून त्यात वाचून "मोडी की बोर्ड" वापरून मोडीतील लिहीलेले जसेच्या तसे टाईप करेल, व ते स्क्रीन वर देवनागरी दिसेल, प्रिंटर वर देवनगरी प्रिंट होईल. किंवा रोमन की बोर्ड मधील कीज अपुर्या पडत असतील तर पूर्ण मोडीचा की बोर्ड ग्राफिक्स बनवून टॅबलेट वर "टच स्क्रीन" पद्धतीने टाईप करता येईल. हल्ली ऍंडॉईड मोबाईल/ टॅबलेट मध्ये देवनागरी टाईपिंग असेच करतात. थोडक्यात, मोडी कागद वाचून ते मोडी की बोर्ड वर टाईप करून देवनागरीत पाहाण्याचे/ प्रिंट करण्याचे अनेक सोपे उपाय आहेत.
सेव करताना देवनगरी सेव होईल का? हा "ट्रिक" प्रश्न आहे. रोमन असो वा देवनागरी/ तमिळ/ अरेबिक/ हीब्रू/ . . . . संगणकात सगळे व्यवहार "बायनरी" च असतात. अर्थात हे जरा सुलभी करण केलेले उत्तर आहे. जास्त खोलात शिरायचे असल्यास ASCI, BCD वगैरे समजावून संगावे लागेल.