मोडीत ऱ्हस्व इकार-उकार नाहीत हा गैरसमज आहे. मोडीत दोन्ही इकार-उकार लिहिता येतात, परंतु  ऱ्हस्वचे दीर्घ करण्यासाठी एक खास 'आळे' काढावे लागते,  ते काढण्याची कटकट नको म्हणून फक्त दीर्घच लिहिण्याची पद्धत आहे.  ऍ आणि ऑ ही अक्षरे तर मराठी सोडून अन्य कोणत्याही भारतीय लिपीत नाहीत, त्यामुळे ती मोडीत नसल्यास आश्चर्य नाही. (हिंदीत हल्लीहल्ली मराठीच्या अनुकरणातून ऑकारयुक्त व्यंजने लिहिली जाऊ लागली आहेत.)