खूप दिवसांनी तुमचे लेख येतात... त्यामुळे ते पुरवून पुरवून वाचावेसे वाटतात. त्यातून खाण्या-पिण्यावर असतील तर फारच!
एकंदरीत हे कॉफी प्रकरण तुमच्या फार आवडीचे दिसते. (पण साखर विरहीत, दूध विरहित (थोडक्यात एक्स्प्रेसो! :-) ) कॉफी चांगली लागते का? असा मला नेहमी प्रश्न पडतो. ती एक 'अक्वायर्ड टेस्ट ' आहे!
बाकी तुमच्या त्या लहानपणीच्या 'चहा' च्या हॉरिबल अनुभवाशी एकदम सहमत.
आणि आजही 'कॉफी' पिणारे चहावाल्यांपेक्षा स्टँडर्ड समजले जातातच की!
पण लिहीत रहा...... आम्हाला तुमच्या लिखाणाची टेस्ट मात्र आकळली आहे!! :-)