प्रकाश यांचे "आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. .. " पटले. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
मी काय लिहिले आहे --- > पण उगीच एखाद्या धर्माबद्दल(मग तो हिंदू वा मुसलमान वा इसाई) तुमचे रिवाज किती बुरसटलेले आणि अयोग्य असे सांगणे आणि वारंवार सांगणे हा प्रकार कधीही चूकच. जनतेचे प्रबोधन करा पण प्रबोधनाचा अतिरेक होऊन तो चिडवण्याचा अथवा डिवचण्या सारखा प्रकार होऊ नये या कडे लक्ष दिले पाहिजे. नाही तर सामान्य लोक नकळत कट्टरपणाकडे झुकत जातील आणि मूळ उद्देशच हरवून बसेल... <---
बहुतेक
प्रतिसाद पाह्न म्हणावेसे वाटते" मै क्या कह राहा हु आप क्या कह रहे हो"
. मी कुठेही कर्मकांड / प्रथा यांचे समर्थन केले नाही. असो थोडि उसंत घेउन माझे मत मांडण्याचा प्रयत्न करेन.
बाकी चेतन पंडित यांच्या प्रतिसादात -
१. "चांगले मार्क मिळविण्या करता अमूक एक शर्ट घालण्या ऐवजी स्वतः वर आणि मेहनतीवर विश्वास ठेवण्यास उद्युक्त करावे" ...
आपण माझा प्रतिसाद पुन्हा एकादा वाचावाः "मला उर्मी देणारी एखादी गोष्ट असेल ती मी मानली तर बिघडले कुठे? ह पण परीक्षेला अभ्यास न करता फक्त अमूक एक शर्ट घालून गेल्यास मार्क चांगले मिळतील असे कोणी म्हणाले (तर ती) नुसाती अंधश्रद्धा नाही तर शुद्ध वेडेपणा आहे... "
२. "कोणत्याही क्लासला न जाता, ट्यूशन न लावता (असल्या चोचल्यां करता पैसेच नव्हते) "
- या मध्ये क्लास / ट्यूशन - चोचले / पैसे नसणे आणि श्रद्धा / अंधश्रद्धा यांचा काय संबंध ते कळाले नाहि... हे वाक्य पुर्वीच्या काळातील स्पर्धा आणि परिस्थितीशी संबंधित असावे. हे म्हणजे तुमच्या काळात / आमच्या काळात या आशयाची चर्चा झाली...
आजच्या काळात मुले "क्लास / ट्यूशन " ला जातात म्हणजे स्वतः वर आणि मेहनतीवर विश्वास नाही आणि तो पण एक "अंधश्रद्धेचा" भाग आहे असे सुचवायचे आहे का?
३. पहिल्याच प्रयत्नात ... सिलेक्ट झालो - अभिनंदन.
पण एखादा (कमी-अधीक प्रमाणात म्हणा) पण देवावर श्रद्धा ठेवून पहिल्याच प्रयत्नात झाला असेल तर ती "अंधश्रद्धा " कशी ? (आणि यश हे सापेक्ष असते - म्हणून अधिक लिहित नाही - मी प्रौढी मिरविणे टाळतो...)
लतापुष्पाजी- माझा लेख/प्रतिक्रिया पुन्हा वाचा - कारण मी कुठेही म्हणालो नाही कि - "मलाच (हिंदुना) का रागवता आणि त्याला (इतर धर्मांना)का नाहि? ..."
मी लिहिले आहे - >" जसे "मुस्लिम = अतिरेकी " तसेच "हिंदू = अंधश्रद्धाळू" हे सारखे दाखवून काय सिद्ध करणार आहेत? त्यातून काही उपाय सुचवला तर ठीक नाही तर अश्या बातम्या आणि उपदेशाच्या अतिरेकाने देशाने फक्त दंगेच वाढतील."
तसा मी वैयक्तिक - टिकाकारांना मानतो - काहिका होइना आपल्या चुका (फुकटात) सांगून आपण सुधारण्याची संधी तरी मिळते. नाही तरी संततुकारामांनी सांगितले आहे की - "निंदकाचे घर असावे शेजारी"...
मी कोणत्याही एका धर्माची बाजू अथवा विरोध केला नाहि. माझे सर्व आधुनीक संताना इतुकेच म्हणणे आहे "जनतेचे प्रबोधन करा पण प्रबोधनाचा अतिरेक होऊन तो चिडवण्याचा अथवा डिवचण्या सारखा प्रकार होऊ नये या कडे लक्ष दिले पाहिजे. नाही तर सामान्य लोक नकळत कट्टरपणाकडे झुकत जातील आणि मूळ उद्देशच हरवून बसेल..." तुमचे रिवाज किती बुरसटलेले आणि अयोग्य असे सांगणे आणि वारंवारसांगून काय साध्य होणार आहे?
दुसर्या एका बाबतीत मी एक उदाहरण देत असतो ते इथे पण लागू पडते - "सोडाजन्य शीत पेये आणि इतर फास्ट फूड" हे शरीरास वाइटम्हणून सांगणारे बरेच आहेत पण त्याला चांगला हेल्दी आहारचा पर्याय काढणारा तोडिचा कोणी भेटला नाहि"... आपल्या समाजचाही (हिंदु/मुस्लिम/इसाइ सगळ्याच... ) असाच काहिसा प्रोब्लेम आहे.
तुर्तास इतुकेच...