प्रस्तावातील म्हणणे बऱ्याच अंशी मान्य.
मागे (जवळ जवळ १३-१४ वर्षांपूर्वी) मुंबईत अशीच एक घटना घडली होती. एका उपनगरातल्या कोण्या एका गल्लीची स्वच्छता तिथे राहणाऱ्यांनी संघटित होऊन स्वतः कष्ट करून केली होती आणि ह्या घटनेची वाहवाही झाली होती.
राहणाऱ्यांसाठी हे कृत्य अभिनंदनीय होते हे खरेच. पण अशा घटनेची प्रक्रिया होऊ शकत नाही. तो एक पराक्रमच होतो. (आणि पराक्रमाचे होते तितके प्रक्रियेचे कौतुक होत नाही. ... करूही नये असे मला वाटते. )
जी गोष्ट प्रक्रियेने व्हावयास हवी तेथे पराक्रम एका अर्थाने अस्थानीच ठरतो असे मला वाटते.