लेख खूप आवडला. मला कॉफीपेक्षा बुडवायची पुडी जास्त वेळ ठेवून केलेला उकळलेल्या पाण्यातला चहाच बरा वाटतो. मायक्रोवेव मध्ये वगैरे कपातच पाणी उकळले की भांडे-गाळणे वगैरे घासायची कटकटही नसते. असा चहा प्यायला लागल्यापासून चहाची खरी चव लक्षात आली. लहानपणापासून चहा हा फक्त बिस्कीट-पाव वगैरे बुडवण्याचे माध्यम म्हणूनच वापरत होतो की काय असे आता वाटत आहे. आले-सुंठ-वेलदोडेवाला चहा अत्यंत थंडीत अगदीच तल्लफ आली तरच प्यावा वाटतो. एस्प्रेसो हा प्रकार मात्र कधी झेपला नाही बॉ. नेसकॅफेचा फक्त सनराईज ब्रँड जरा बरा वाटतो.

आता चहा प्यायची तल्लफ आली.