मला चहा आवडतो.

चहा केला आहे आणि मी तो नको म्हणालो असे होत नाही. कुठल्याही प्रतीचा चहा मला आवडतो.

मात्र इतके असूनही एकदा मला एका ठिकाणचा चहा दोन घोट घेताच नकोसा झाला होता.

लग्नानंतर आम्ही नुकतेच एका ठिकाणी भाड्याने राहायला गेलो होतो. तिथे सामान वगैरे लावून झाल्यावर शेजाऱ्यांनी बोलावून नेले. तिथे आणखी मंडळी होती आणि चहा केला होता. आता सामान लावून दमलेलो असल्याने आयता चहा मिळतोय ह्याचा मनोमन आनंद झाला खरा मात्र तो चहा इतका भयानक होता की अक्षरशः दोन घोटात नको नकोसा झाला.

"चहा नको" असे हे आयुष्यात आतापर्यंत एकदाच झालेले आहे.