माझ्यासाठी चहा म्हणजे सवाष्णीचं कुंकू आहे.
मला मात्र चहा दोन वेळेलाच प्यायला आवडतो. सकाळी उठल्यावर आणि दुपारचा चहा. आणि फक्त तेलकट तूपकट खाणे झाले असेल तर त्यावर चहा लागतो.
आणि असाच चहा आवडतो - खूप दुधाळ नाही की लालभडक रंग आलेला नाही. अगोड नाही की मिट्ट गोडही नाही. कॉफी तितकीशी आवडत नाही. अर्थात थोडे दूध जास्त असलेली आणि थोडी जास्त गोड असलेली आणि कडक कॉफी आवडते. त्यातून जायफळ आणि वेलची घालून असेल तर मस्तच !