आमच्याही लग्नात झाला होता. लग्न होऊन काही नातेवाईक, माझे ३-४ मित्र आणि आम्ही कुटुंबीय संध्याकाळी ५ वाजता घरी आलो.  आल्या आल्या रोहिणीला चहाची फर्माईश केली. पाचच मिनिटात ती  मित्रांसाठी (आणि माझ्यासाठी) चहा घेऊन आली. तो चहा पिण्याच्या लायकीचा नव्हता (माझी आजी असती तर काय मांजरमुतवणी चहा केलाय म्हणून ओरडली असती). रोहिणीला विचारल्यावर समजले की ती चहा साखरेचे डबे शोधत असताना माझी एक "काटकसरी" आत्या तिथे आली, आम्ही सकाळी कार्यालयात निघायच्या आधी म्हणजे सकाळी ६ वाजता केलेला चहा तिथेच पडला होता तोच गरम करून आम्हा मित्रांना रोहिणीतर्फे पाठवला. :(

विनायक