सर्वप्रथम, अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार.

शेवटच्या द्विपदीत मिलिंद ऐवजी 'मिल्या' असे केलेत तर वाचायला सोपे जाईल! किंव दुसरे काही रूप जमते का तेही पाहावे. ( मिलिंद् असे म्हणणे जरा नकोसे वाटले.)
- खरे तर गेली काही वर्षे मी सहसा 'भृंग' हेच तखल्लुस/टोपण-नाव वापरत असूनही इथे मुद्दाम 'मिलिंद' योजले. ह्याला कारण हे की मिलिंद हे कृष्णाच्या नावांपैकी एक आहे.
नवजात कृष्णास टोपलीत घालून वसुदेव गोकुळास नंदाकडे नेत असताना मध्ये पूर आलेली यमुना नदी आडवी येते ही कथा सर्वश्रुत आहे. वसुदेवाच्या डोक्यावर यमुनेचे पाणी चढते, टोपलीतून बाहेर आलेल्या कृष्णाच्या पायाच्या अंगठ्याचा तिला स्पर्श होतो व ती शांत होते, पूर ओसरतो.  यमुना कृष्णाला वाट करून देते. त्या द्विपदीच्या दुसऱ्या ओळीत रूपक म्हणून वापरलेली ही घटना अधोरेखित करण्यासाठी जाणूनबुजून 'मिलिंद' वापरले आहे. त्यासाठी पदांती एक लघु मात्रा अधिक वापरण्याची (गझलतंत्रात मान्यता असलेली) सूटही घेतली आहे.