कोणतेही मूळ काम (ओरिजिनल वर्क) ज्याचे त्यानेच करावे. अन्यथा न करणारा आळशी होतो. तपासणाऱ्याचे काम तपासण्याचे
व चुका दाखवण्यापर्यंतच मर्यादित असावे , नाहीतर शॉप फ्लोअरवरचा मॅनेजर स्वतः कामगाराचे काम करायला लागला तर कसं होईल ? मी स्वतः प्रशासकीय कामात होतो, त्यावेळी असाच अनुभव आला. हाताखालच्या माणसांमध्ये मिळून मिसळून वागल्याने लवकरच आवडता झालो. पण मी कमकुवत प्रशासक म्हणूनच प्रसिद्धीस आलो. आपलं लिखाण योग्य आहे. मूळ काम करणाऱ्याला उत्तेजन म्हणून कामाचा थोडा भाग एखाद वेळेस करून दाखवणं वेगळं आणि आपण तेच काम नेहमी स्वतः करणं वेगळं.