प्रचलित शब्दांनी जर एखाद्या वस्तूची योग्य व अचूक कल्पना येत असेल तर वापरात नसलेला अथवा शोधलेला वा तयार केलेला 
शब्द कशासाठी हवा ? बरोबर व चूक यातील बरोबर हा शद्व जरी मराठी नसला (स्वातंत्र्यवीरांच्या म्हणण्याप्रमाणे) तरी अचूक हा मराठी शब्द 
योग्य असूनही आपण वापरीत नाही, याचे जे कारण आहे तेच कारण सिमेंट या शब्दाच्या वापराचे आहे. मलाही मराठी शब्द वापरायला आवडतात,
परंतू सर्व मराठी माणसांनी जर कटाक्षाने मराठी भाषाच  वापरली तरच हे सगळं शक्य आहे. दोन मराठी माणसं बऱ्याच वेळेला इंग्रजी किंवा  
हिंदी मिश्रीत मराठी बोलतात त्याचं काय करणार ? अन्यथा, " कढत, गार,  उन, इत्यादी आणि इतर अनेक शब्द वापरात राहिले असते त्या ऐवजी गरम, थंड हे शब्द प्रचलित झाले नसते. असो. हा विषय तसा मोठा आहे. मी सध्या मूळ मराठी शब्द व वाक्यरचना आणि वापरात असलेला प्रचलित हिंदी शब्द व  वाक्यरचना  ही यादी  बनवीत आहे. बरीचशी पूर्ण झाल्यावर मनोगतावर पाठवीन.