संजय देशपांडे यांचे पर्यंत ही चर्चा मी इमेलद्वारे पोहोचवली. त्यांचे खालील मत मला मेलद्वारे आले. मूळ इंग्रजी चा स्वैर अनुवाद.----
मुद्दा वैध आहे. परंतू एखाद्या अडचणीवर कसे व्यक्त व्हावे हे तो त्याकडे कसे पाहतो यावर अवलंबून आहे. या तर्कशास्त्राप्रमाणे लोक मूल दत्तक का घेतात? सर्व अनाथ मुलांचा सांभाळ शासनाने केला पाहिजे. आपण काहीतरी करतो आपल्याकडे ती क्षमता असते व ती वापरण्याची इच्छा असते. कारण शासन म्हणजे दुसरेतिसरे कोणी नसून आपणच आहोत. शासन सर्व काही करत आहे ही आदर्श अवस्था आहे आणि मग कुणी संजय देशपांडेला मुतारी दत्तक घेण्याची आवश्यकता नाही. पण तसे ते आहे का? आणि जर सार्वजनिक मुतारी जर घाणेरड्या अवस्थेत असतील तर आपण काय करतो आहोत? हा प्रश्न मी स्वतःला विचारला. मी अस कधीही म्हणालो नाही कि योग्य व अंतिम उत्तर माझ्याकडे आहे. हे उत्तर माझ्यापुरते आहे. काहीच न करता शांतपणे बसून व्यवस्थेला व शासनाला शिव्याशाप देण्यापेक्षा हे करून मला बरं वाटतं.
संजय देशपांडे
जास्त नको मजकुरात रोमन १० टक्के पेक्षा जास्त नको