असहमती संजय देशपांडे यांनी जे केले त्या बाबत नसून अभीजीत घोरपडे यांनी ते कसे "पेश केले" त्या बाबत होती. कदाचित ते माझ्या मूळ लेखात नीट उतरले नाही. पण त्या आधी - लोक मूल दत्तक घेतात कारण त्यांना अपत्य हवे असते पण काही वैद्यकीय कारणा मुळे स्वतःचे अपत्य होऊ शकत नाही, म्हणून. अनाथ मुलांचा सांभाळ व्हावा या उदात्त हेतूने स्वतःचे अपत्य असून सुद्धा दत्तक घेणारे काही असतील, पण अशी उदाहरणे अपवादात्मकच.
तर संजय देशपांडे यांनी जे काही केले ते वेगळ्या प्रकारे आपण पण करतच असतो. चोरी होऊ नये अशी व्यवस्था करणे पोलिसांचे काम असले तरी त्यांच्या कडून होत नाही म्हणून आपल्या खर्चाने सुरक्षा गार्ड ठेवतो; स्वच्छ पाणी पुरविणे महापालिकेचे काम असले तरी त्यांच्या कडून होत नाही म्हणून आपल्या खर्चाने अक्वागार्ड लावतो; इत्यादी. तर संजय यांनी जे केले ते अभिजीत यांनी फक्त सांगितले असते तर काहीच इश्यू नव्हता. पण त्या पुढे जाऊन त्यांनी जो इतरांनी पण तसेच करावे, म्हणजे आपले गांव/ परिसर सुंदर स्वच्छ . . . इत्यादी स्वर लावला, तो मान्य नाही. अभिजीत यांनी वैयक्तिक जरी नाही तरी पत्रकार संघाने एकादी मुतारी दत्तक घेऊन सांभाळावी, व मग इतरांना उपदेश करावा.