म्हणजे देशपांड्यांनी ते अभीयान घ्यायला का घोरपडे म्हणतात याप्रमाणे इतरांनीही अशी कामं करायला हवीत याला?
साधी गोष्ट आहे, प्रत्येक वैकल्पिक कामात काही तरी स्वार्थ असल्याशिवाय ते कुणी करत नाही. देशपांडे बिल्डर आहेत आणि लोकांची एक चांगली सोय केल्याबद्दल त्यांची जाहिरात होणार आहे. कॉर्पोरेशनच काम कॉर्पोरेशनं करायला हवं हे मान्य पण देशपांड्यांनी स्वखुषीनं केलं तर आपल्याला काय फरक पडतो? शेवटी स्वछतागृह उत्तम स्थितीत असल्याशी कारण.
आता राहिला प्रश्न घोरपड्यांचा, तर अशी (दुसऱ्याची) कामं, आपल्याला आनंद वाटत असेल तर आपण अंगीकारावीत (जसं देशपांड्यांनी केलं) नाही तर सोडून द्यावी. अर्थात, ज्याचं काम त्याला करायला लावणं हे सुद्धा एक कामच आहे.