आजकालच्या पिढीचं आणि थोड्या मागच्या पिढीचं हे स्फुटं वाचून आनंद झाला. काय गप्पा ते मारू शकतात याचा हा 
आढावा आवडला. आता यापुढे याही पेक्षा जास्तच तांत्रिक  (टेक्निकल म्हणायचंय मला प्रतिशब्द सुचला नाही) गप्पा होतील . त्याप्रमाणात उपमाही बदलतील. पण हरकत नाही ही काळाची गरज आहे. याला आपण ब्रेन ड्रेन ही म्हणू शकतो. नाहीतरी घरच्या गप्पा ब्रेन ड्रेन सारख्याच 
असतात. काही उपमा आवडल्या. उदा: तृणमूल काँग्रेस इ. आपलं लिखाण साधं असलं तरी ओघवतं असतं, हे नक्की. थोडा यांत्रिकी तपशील मात्र कधी कधी बोअर करतो. परंतु परत येणारा व्यक्तिगत स्वरूपाचा तपशील मात्र छान वाटतो. माझी आपल्याला एक विनंती आहे. जुन्या काळात जर ही चॅटिंगची सोय असती तर संवाद कसे झाले असते हे आपण लिहाल तर जास्त रोचक होईल.   सुंदर लिहिता. लगे रहो सुधीरभाई. ......