लोकांची मराठी वाचण्याची मारामार आहे, आणखीन मोडी काय करायचंय ? छंद म्हणून मनोगतावरचे लेखक, वाचक कदाचित
त्यात रस घेतीलही. पण मोडी लिपीच्या विकासाला फारसा प्रतिसाद मिळेल असे वाटत नाही. आधीच मराठी मोडीत काढायला निघाले आहेत.
त्यात मोडीचे वाकडे वळण.मराठी भाषेचं हे वाकडं वळण कितपत झेपेल कुणास ठाऊक . मला स्वतःला रस आहे, कारण माझे वडील कार्यालयातही (ते कोर्टामध्ये कामाला होते. आणि १९६६ साली निवृत्त झाले. ) मोडीत अहवाल लिही असत. आणि आम्हालाही थोड्याफार प्रमाणात मोडी शिकवलेले होते. त्यामुळे आम्हाला काही ना काही तरी वाचता येते. असो. मोडी लिपी चालू झाली तर नको आहे असे नाही. पण फारसं व्यवहार्य नाही, असं वाटतं.