प्रवास वर्णन म्हणजे फक्त "डब्लीनला सकाळी ८ वाजता बस मध्ये बसलो. मध्ये एका ठिकाणी बस थांबली तिथे चिप्स ऍंड बीन्स खाल्या.  दुपारी बारा वाजता गालवेला पोहोचलो" असे अक्षरशः "वर्णन";  व मधून मधून "रस्ते स्वच्छ होते. आपल्या कडे असे का नाही? " असा स्वर, येवढेच नव्हे. प्रवास वर्णन म्हणजे त्या जागेतील काही विशेष, ज्याला इंग्रजीत "डीप इनसाईट" म्हणता येईल, ते हवे. अशी प्रवास वर्णने फार कमी.

माझे स्वतःचेच प्रवास वर्णन पुस्तक - यात प्रवास वर्णन व्यतिरिक्त बरीच उपयोगी माहिती पण सापडेल. जसे - कुठल्यातरी प्रवास कंपनी बरोबर मेंढरे हाकल्या सारखे न जाता स्वतःचा प्रवास स्वतः कसा आखावा, इंटरनेट वरून हॉटेल बुक करताना चांगले हॉटेल कसे हुडकावे, परदेशात कमी खर्चात जेवण, विशेष करून शाकाहारी करता - कसे करावे, परदेश प्रवासात कपडे धुण्याचे कसे करावे, विमान प्रवासा बाबत टीप्स, इत्यादी. हे पुस्तक स्वनुभावा वर आधारित असल्याने सर्व माहीती खात्री लायक असण्याची गॅरण्टी आहे. मात्र, हे पुस्तक अजून बाजारात यायचे आहे. कारण ते अजून छापले गेले नाही. कारण ते अजून लिहायचे आहे. पुढच्या तीन-चार वर्षात मी ते लिहायला घेईन अशी दाट शक्यता आहे.