परभारतीयजी आय मीन परभारतीया,

मला तुमचे पटते. जी ची अजिजी ही उर्दूतूत आली असावी. पण मराठीत ते बरे नाही वाटत.
मागे एकदा शरद पवारच्या सत्काराला त्याचे नाव शरच्चंद्ररावदादासाहेबजी पवार असे वाचले होते. ते वाचून अप्पा आणि अण्णा हे दोन आदरार्थी प्रत्यय का वगळले ह्याचे आश्चर्य वाटले होते. असो. पण मराठीतही नेते वा गुरुजी सहसा एकारार्थी संबोधले जात नाहीत. तेव्हा अमेरिकेचे उदाहरण इकडे पूर्णपणे लागू नाही. अमेरिकेत शाळेत शिक्षकांना मिस्टर अमुक किंवा मिस वा मिसेस् तमुक म्हटले जाते. कधीकधी नावानेही हाक मारतात. पण महाराष्ट्रात तसे पचनी पडणार नाही.  वाजपेयी निवडणूक हरला. अडवानी भाजपचा नवा नेता झाला. शिवाजी पार्कवरच्या भव्य सभेत बाळ ठाकरे गरजला वगैरे बातम्यांची शीर्षके वाचायला विचित्र वाटतील नाही का?

पॉलिटिकली करेक्ट ला चांगला मराठी शब्द कुणी सुचवेल का?