छान कल्पना आहे. पण पुस्तक छापून विकण्याचा प्रयत्न न करावा हे बरे. आपल्याकडे वर्गणी देऊन किंवा फुकट  पुस्तकं वाचण्याची प्रथा जास्त आहे. विकत घेऊन पुस्तक फारसे लोक वाचीत नाहीत. (निदान मराठी माणसं तरी. विकत घेणाऱ्यांनी मला  क्षमा करावी .  पण ही टक्केवारी कमी आहे एवढच मला म्हणायचे आहे. ) त्यामुळे  पुस्तक छपाई आणि प्रकाशनाचा खर्च निघणंही फार मुष्किल होतं.  शिवाय न 
विकल्या गेलेल्या प्रतीही प्रकाशक घरी आणून टाकतो. त्यामुळे ते सारखे डाचत राहते व घरातली इतर माणसेही आपली खिल्ली उडवीत राहतात 
असा अनुभव आहे. ई पुस्तकाचा अनुभव नाही. कदाचित  ते एवढे तोट्यात जात नसावे. शेवटी छापलेल्या प्रती आपल्याच नातेवाईक व मित्र मैत्रिणींना मोफत द्यावी लागतात. तेवढाच घरातला पसारा कमी. जर पुस्तकांच्या प्रती घरी पाठवलेल्या नसतील , तर प्रकाशक इतर पुस्तकांसोबत तुमचे पुस्तक फुकट देतो व त्या प्रती त्याच्या गोडाऊन मध्ये ठेवण्याच्या मनस्तापातून मुक्त होतो. पुस्तक छपाईच्या वेळेला 
प्रकाशक असेही सांगतो "पाहा तुम्हाला बाजारात नाव नाही. पु̮̮. ल. , मिरासदार , आणि इतर सगळे उल्लेखनीय लेखक यांच्या नावावर काहीही 
खपते. तुम्हाला  कोणीही ओळखत नाही. तुम्ही कोणताही परतावा मिळण्याची अपेक्षा  या धंद्यातून करू नका. " खरतर हे त्याचं म्हणणं बरोबर 
असतं. पण आपलं पुस्तक छापून येणार या भावनेने आपण एवढे भारावून गेलेलो असतो की या गोष्टीचा आपण विचार करीत नाही. पण तुमची 
स्वतःची घरोघर फिरून पुस्तक खपविण्याची तयारी असल्यास ठीक होईल. मी आपणास नाउमेद करीत नाही. फक्त  इतकच की निरपेक्ष 
बेद्धीने हे कार्य केलंत तर बरं होईल. अजून माझ्या पुस्तकाचा हिसाबकिताब प्रकाशकाने केला नाही . तो झाल्यावर अधिक चांगले लिहिता येईल.