काहीही हरकत नाही.
१- "वाजत-गाजत" फॉर्मल व स्व-निर्धारित निवृत्ती ही फक्त काही फार मोठ्या खेळाडूं करताच असते. अनेक इतरां करता संघात निवड न होत राहाणे म्हणजेच निवृत्ती असते. जे सध्या संघातून बाजूला आहेत, ते फक्त तात्पुरतेच बाजूला आहेत असे त्यांना कोणीच स्टॅम्प पेपर वर लिहून दिलेले नाही.
२- सर्वसाधारणपणे कोणत्याही क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यावर त्याविषयी
सल्लागार . . . . . वगैरे जे तुम्ही लिहीलेत, ते फक्त सरकारी नोकरीत असलेल्यांनाच लागू अहे, कारण त्यांना एक "कोड ऑफ कंडक्ट" असते. इतर कोणत्याही क्षेत्रात असे नाही. दीपीका पांडुकोण, दीपक पारेख, भालचंद्र नेमाडे, संजीव अभ्यंकर, राज ठाकरे यांनी अनुक्रमे सिनेमा/ अर्थ व्यवस्था/ साहित्य/ संगीत / राजकारण यातून निवृत्ती घेतल्यावर मगच त्या विषयी बोलावे असा कोणताही संकेत नाही.
३- खेळांच्या बाबतीत सुद्धा कपिलदेव, गावसकर, वसिम अक्रम वगैरे सर्व उदाहरणे फक्त क्रिकेट पुरतीच आहेत. कारण चालू असलेल्या श्रुंखले बद्दल टीव्ही वर अखंड वट-वट-वट-वट करण्याचा प्रघात फक्त क्रिकेट मध्येच आहे. मी हे लिहीत असताना, म्हणजे ६ मार्च २०१५ रोजी, इंग्लंड मध्ये "ऑल इंग्लंड" ही बॅडमिंटन ची सर्वात मानाची टूर्नामेंट चालू आहे व आजच सकाळच्या पेपर मध्ये बातमी आहे कि सायना नेहवाल हिने क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. कोणत्याही टीवी चॅनल ने बॅडमिंटनच्या कोणा आजी / माजी खेळाडूंना बोलावून काही चर्चा केली? ती जिंकली येवढी बातमी न्यूज मध्ये दिली तरी भरून पावले अशी स्थीती आहे.
४- आणि हे तथाकथित "पूर्ण क्षेत्र गाजवून झाल्यावर" समीक्षा करणारे काही तरी विद्वत्तपूर्ण सांगत असतात असे ही नाही. आपल्या संघाच्या धांवा कमी पडल्या कि "आपण फलंदाजी वर जास्त लक्ष द्यायला पाहिजे"; किंवा प्रतिस्पर्धी संघाने धांवांचा डोंगर रचला कि "आपण गोलंदाजी व क्षेत्र रक्षणात कमी पडलो" असल्या कॉमेंटस असतात. हे सांगण्या करता गावस्कर कशाला पाहिजे? असल्या कॉमेण्टस माझा आठ वर्षांचा नातू सुद्धा करू शकतो, करतोच.
५- चर्चेचा दर्जा एवढाच असतो कारण प्रेक्षकांची आकलन शक्ती पण तेवढीच असते. क्रिकेट बाबत या चर्चा कानात प्राण आणून ऐकणार्यांना प्रश्न विचारून पाहा "सिली मिडॉन" कुठे असतो. "वॉशिंग्टन पासून पन्नास किमी उत्तरे कडे", येथ पासून ते "पाठी कडे डाव्या बाजूला किडनीच्या थोडा खाली" येथ पर्यंतची उत्तरे मिळतील.
६- बुद्धीबळ या खेळात "आनंद याच्या कालच्या गेम बाबत तुमचे काय मत आहे" असा प्रश्न कास्पारोव याला विचारतात, व कास्पारोव त्याचे उत्तर देतो. (आपल्या देशातील चॅनलस वर नव्हे. इतरत्र. आपल्या कडे "आनंद ? कोण हा आनंद? " असा आनंदी आनंद आहे) क्रिकेट चर्चेतले प्रश्न कसे असतात ? संदीप पाटील यांना विचारतात "कालच्या मॅच मध्ये सेहवाग याच्या फलंदाजी बाबत हॅडली याने केलेल्या टीके वर कपिल देवने जे काही म्हंटले त्याचे वकार युनुस ने केलेले समर्थन चुकिचे आहे असे रणतुंगा म्हणतो, या बाबत तुमचे काय मत आहे? ". (तपशील जरा चुकला असेल, पण प्रश्नांचा दर्जा असाच असतो)
ना प्रश्न कुणाला कळला, ना उत्तर कुणाला कळले. काय फरक पडतो? क्रिकेट मधील या चर्चा म्हणजे वास्तविक अफूची एक गोळी असते. कारण क्रिकेट हेच मुळात अफूची गोळी आहे. बीयरचा कॅन उघडला, चिप्स चे पाकीट उघडले, कोणत्या तरी चॅनल वर "अफूची गोळी" लावली, आणि आता दिवस भराची निश्चिंती. तेव्हां, चॅनल्वर कोणाला बोलाविले, त्याला काय प्रश्न विचारला, त्याने काय उत्तर दिले, . . . . काहीही फरक पडत नाही.