वर्तमान पत्रे म्हणजे शास्त्रिय शोध निबंध प्रसिद्ध करण्याचे "जर्नल" नव्हे. वर्तमान पत्रातील लेख प्रसिद्ध करण्या आधी त्या त्या क्षेत्रातील मान्यवरां कडून तपासून घेतलेले - म्हणजे "पीअर रिव्यूड"  - नसतात. कोणत्याही वर्तमान पत्राची एक भूमिका असते, व त्या भूमिकेस अनुरूप असेल ते काहीही ते छापतील, व त्या भूमिकेच्या विरुद्ध असेल ते छापणारच नाहीत. तर, वर्तमान पत्रातील लेख गांभीर्याने घ्यायचे नसतात.

तरी, तुम्ही केली आहे अश्या प्रकारची टीका करणार्यांच्या विरुद्ध माझी एक तक्रार आहे. काही विषय असे असतात कि त्या बाबतीत सत्य असे असले काय किंवा तसे असले काय, वर्तमानात काहीही फरक पडत नाही. एके काळी मराठी सर्व भारताची भाषा होती किंवा नव्हती; कुठल्या तरी प्राचीन काळात आपण विमाने बनवू शकत होतो/ नव्हतो;  प्लास्टिक सर्जरी करू शकत होतो/ नव्हतो; . . . . जे शोध आता पर्यंत लागले आहेत ते सर्वच्या सर्व, जे शोध अजून लागलेच नाहीत ते पण सर्वच्या सर्व, व जे शोध भौतिक शास्त्राच्या मूलभूत नियमांच्या विरुद्ध आहेत व म्हणून कधी लागणे शक्य पण  नाही ते सुद्धा सर्वच्या सर्व  प्राचीन काळी आपण लावले होते, आणि ते सुद्धा मराठीत. मान्य करून टाका ना एकदाचे. म्हणजे मग आपण आजच्या प्रश्नांवर विचार करायला मोकळे.