भरपूर अभ्यास करून तज्ज्ञांकडून तपासून घेऊन प्रसिध्द करण्याकरिता काही नियतकालिके असतात ज्यांना पीअरली रिव्ह्यूड जर्नल्स असे म्हणतात. वर्तमानपत्र हे माध्यम सर्वसाधारण पत्र आहे. वर्तमानपत्र पीअरली रिव्ह्यूड जर्नल नसल्याने त्याच्याबाबत संदर्भाची मागणी कोणी केल्याचे ठळकपणे स्मरत नाही. गरज असल्यास लेखकाशी व्यक्तिगत संपर्काद्वारे चर्चेचा मार्ग आहे. संदर्भाची मागणी तुमच्याप्रमाणे कोणी केल्यास त्यावर लेखक उत्तर देतो किंवा देतही नाही. अती चर्चा झाली तर अखेरीस वर्तमानपत्रे हा 'विषय आम्ही येथेच थांबवीत आहोत', असे जाहीर करतात आणि विषय संपवतात.