आपण स्पष्टवक्त्यांना (खरं तर फटकळांना) घाबरून असतो याचं खरं कारण आपल्याला हजरजवाबीपणे प्रत्युत्तर देता येत नाही.  स्पष्टवक्ता जर आपला अवगुण दर्शवत असेल तर त्याची दखल घेणं नेहमी फायद्याचं ठरतं.

स्पष्टवक्तेपणाचा नेमका अर्थ खरेपणा  आहे जो प्रत्येकात असायला हवा, म्हणजे आत एक आणि बाहेर एक अशी मानसिकता नको. जे मनात तेच शब्दात ही स्पष्टवक्तेपणाची खूण आहे आणि अशी व्यक्ती वंदनीय आहे.

बहुदा गोड बोलणारे अंतरद्वंद्वानं त्रस्त असतात असा अनुभव आहे कारण त्यांना गोड बोलून स्वतःचं काम करून घ्यायचं असतं किंवा उगीच झंझट नको म्हणून ते बोटचेपेपणा करत असतात. असे लोक कधीही कुठला स्पष्ट स्टँड न घेता स्वतःची प्रतिमा जपत राहातात. अशा लोकांचा मला व्यक्तीशः कधीही भरोसा वाटत नाही. आणि फटकळांची कधी भीती वाटत नाही कारण त्यांच्या बेजवबदार विधानांना योग्य प्रत्युत्तर दिलं की ते आपल्याबाबतीत पुन्हा तसा प्रयत्न करत नाहीत.