स्पष्टवक्ता, फटकळ या शब्दांनी लेखकाला जे म्हणायचे आहे आणि जे मला आकलन होते ते वेगळे आहे. लेखक ज्या लोकांना स्पष्टवक्ते म्हणतो त्या व्यक्तींना मी छिद्रान्वेषी म्हणेन. फक्त दुसऱ्याचे दोष दाखवणे हेच त्यांचे काम. त्यांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे.
दुसऱ्याची एखादे स्वभावविशेष/कृती न आवडल्यास/पटल्यास कुठलीही भीड न बाळगता संबंधित व्यक्तीला सांगतो तो स्पष्टवक्ता. त्याला कारणे विचारल्यास तर्काला पटेल असे स्पष्टीकरणही तो (न रागावता) देतो. मुख्य म्हणजे ही बाब सरसकट नसून न आवडलेल्या स्वभावविशेष/कृतीपुरती सीमित असते.
स्वतःला न पटणारी/आवडणारी गोष्ट जे लोक तिरकसपणे सांगतात त्यांना मी फटकळ म्हणतो. पु. लं. चा अंतू बर्वा हे उत्तम उदाहरण. चहात दूध कमी आहे हे सरळ सांगण्याऐवजी "आज रत्नांग्रीतल्या सगळ्या म्हशी गाभण का रे? " असे विचारणे हा माझ्या मते फटकळपणा.
बाकी संजय क्षीरसागरांशी सहमत. मतलबी गोड बोलणाऱ्यांपेक्षा स्पष्टवक्ते/फटकळ लोक केव्हाही चांगले.
विनायक