मूळ लेखात स्पष्टवक्तेपणा विरुद्ध इतरंचे दुर्गुण सांगणे, ते असूये पोटी करणे वगैरे एकमेकांशी कहीही संबंध नसलेल्या गोष्टींची गल्लत केली आहे, व तीच गल्लत पुढील अनेक प्रतीसादात चालू राहीली आहे. जसे "लेखक ज्या लोकांना स्पष्टवक्ते म्हणतो त्या व्यक्तींना मी छिद्रान्वेषी म्हणेन." हा प्रतीसाद. स्पष्ट बोलणे किंवा फटकळ बोलणे म्हणजे दुसर्याची छिद्रे दाखविणे हे कसे काय? एक उदाहरण घेऊन सांगतो (खरी घटना) एकदा दिल्लीला माझ्या कडे एक कोणी असे गृहस्थ ज्यांची आमची अजिबात ओळख नाही, मझ्या एका जवळच्या मित्राची ओळख काढून पाहुणा म्हणून आली व चार दिवस राहीली. ठीक आहे, आम्ही दिल्लीला असताना, हॉटेलचे भाडे परवडत नाही म्हणून कधी कधी इनडायरेक्ट ओळख काढून लोक आमचे कडे येत असत. पण हे गृहस्थ राहीले ते हॉटेल मध्ये राहावे अश्या पद्धतीने, जसे - त्यांना दिलेल्या खोलीत बंदिस्त राहणे, फक्त जेवणाचे वेळी सगळ्यांच्यात बाहेर येणे, त्याम्नी बरोबर आणलेला ट्रंझिस्टर त्यांच्या खोलीत वाजविणे, वगैरे. नंतर पुन्हा एकद्या त्या मित्राचा फोन आला कि त्या व्यक्तीला परत एकदा दिल्लीला यावे लागणार आहे, परत आमच्या कडे आलेले चालेल का? मी माझ्या मित्राला स्पष्ट सांगितले कि आम्हाला त्यांचे वर्तन आवडले नाही, म्हणजे काय ते पण सांगितले, व त्यांनी दुसरी सोय बघावी.

हा शुद्ध स्पष्टवक्तेपणा होता. यात काहीही छिद्राण्वेषी नव्हते, ज्या व्यक्तीची माझी ओळख पण नाही जिला मी परत भेटाणार पण नाही, त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी करण्यात करण्यात मला काहीही रस नव्हता, व त्या साठी मी "स्पष्टवक्तेपणाचे हत्यार" वापरले नव्हते, काहीही असूयेपोटी आणि द्वेषापोटी नव्हते, उणी दुणी काढण्याचा काहीही हेतू नव्हता. कळले? स्पष्टवक्तेपणा म्हणजे मनात जे आहे ते सांगणे. 

आणखीन एक उदाहरण. मल्लिकार्जून मानसूर आजारी असतान पुल एकदा त्यांना भेटायला हुबळी (का धारवाड ?) गेले. भेट झाल्यावर त्यांनी जीए ना विचारले तुमच्या कडे पण आलो तर चालेल का? जीए नि उत्तर दिले "तुम्ही मल्लिकार्जून यांना भेटायला आले असताना "आता आलोच आहोत तर" म्हणून  माझी पण भेट "उरकून घेण्याचे" कारण नाही. तुम्हाला मला भेटावेसे वाटेल तेव्हां अवश्य यावे.

कळले? स्पष्टवक्तेपणा म्हणजे मनात जे आहे ते सांगणे.  जीएंना काय छिद्रान्वेशी होते? त्यांना पुलंचा आत्मविश्वास कमी करायचा होता?  असूयेपोटी, द्वेषापोटी ? उगाच आपले कै च्या कै.