चेतनभाउ, चोरी आणि बलात्काराची तुलना होउ शकत नाही. लाखभर रुपयांच्या चोरीमुळे कुणी आयुष्यातून उठत नाही
बलात्काराची तुलना करायचीच असेल तर खुनाशी करता येईल. खून झालेल्या व्यक्तीच्या बायकोला कुणी हे सांगत नाही की "तुझा नवरा तीकडे कशाला गेला होता. त्याचीच चुक आहे. गप्प घरी बसला असता तर त्याला स्वतःचा खून टाळता आल असता. पण तोच बेजबाबदार पणे वागला". असे सांगणे कीती असंवेदनाशील होइल. असे सांगणाऱ्या व्यक्तीकडे काही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीचा / गुन्हेगारांचा साथीदार, सहानुभुतीदार ही समजतील.
बलात्कार हा बऱ्याचदा बळीच्या आयुश्यावर खुनापेक्षाही जास्त वाइट परीणाम करतो. बळीच्या घरच्या जवळच्या लोकांवरही तीतकाच वाइट परीणाम करतो. त्याची तुलना कमीत कमी खुनाबरोबर तरी करायला हवी.
म्हणुनच बलात्काराच्या बळींना कीतीही चांगल्या उद्येशाने काळजी घेण्याचा सल्ला दीला तरी तो एक प्रकारची असंवेदनाशीलता दाखवतो. काही लोकांना ते बलात्काराचे अप्रत्यक्ष समर्थन वाटते.