1. मसाप एक बिगरसरकारी सामाजिक संस्था आहे.
  2. तिला स्वतःचे सदस्य निवडायचा अधिकार आहे.
  3. तिला सरकारकडे / खासगी संस्थांकडे मदत मागायचा अधिकार आहे.  तशी मदत करायची / नाकारायची हा निर्णय मदत करणाऱ्याचा आहे.
  4. आपल्या निवडणूका कशा प्रकारे घ्यायच्या हे ठरवायचा अधिकार मसाप ला आहे.

  1. तर मग अध्यक्षनिवडीवरून वाद का होतात?
  2. सरकारने अनुदान द्यावे / न द्यावे यावरून वाद का होतात?
  3. संमेलन भरवावे / न भरवावे / कुठे भरवावे यावरून वाद का होतात?

याच धर्तीवर विचार करता बीसीसीआय ही देखील एक बिगरसरकारी सामाजिक संस्था आहे मग तिचे खेळाडू क्रिकेट मध्ये जिंकल्यावर, भारत जिंकला असे म्हणत फटाके वाजवित आनंदोत्सव साजरा करणे हा देखील भाबडेपणाच ठरावा.