कविता आवडली.

अवांतर प्रश्न - लागत आहे ऐवजी लागते आहे असे का लिहिले आहे? मला हा प्रश्न आधीपासूनच आहे, ह्या कवितेचे केवळ निमित्त आहे.
लिहिणारी व्यक्ती स्त्री असेल तर मी बोलते आहे/करते आहे/ वाचते आहे असे लिहिते, आणि पुरुष असेल तर मी बोलतो आहे/ बघतो आहे/करतो आहे/ वाचतो आहे, असे लिहितो, असे मला हल्लीच्या लेखनात जास्त दिसते. मी बोलत/ करत/ वाचत/ बघत आहे असे लिंगनिरपेक्ष लिहिणे जास्त योग्य नव्हे का? नसल्यास का नाही? 
(पुरुष) मी बोलतो वा (स्त्री) मी बोलते हे ठीक, पण पुढे आहे हा शब्द आला तर मी बोलत आहे असे असायला हवे असे मला वाटते, ते वाटणे योग्य आहे का? नियम काय सांगतात?