सर्वच द्विपदी उत्तम आहेत. त्यातही

मृतांचा कोण हेवा वाटतो आम्हा जिवंतांना
तुम्ही सुटलात, आम्हाला जळावे लागते आहे

ही जास्त आवडली.

वरदाच्या प्रश्नाबद्दल - मला वाटते या गझलेतली क्रियापदे वेगळ्या प्रकारची आहेत. जळावे लागते आहे, शिवावे लागते आहे अश्या प्रकारच्या क्रियापदांचे हे प्रयोग लिंगनिरपेक्षच आहेत. पुरुष किंवा स्त्री दोघांनाही हेच प्रयोग वापरता येतील. जळतो/जळते आहे किंवा शिवतो/शिवते आहे यासारखे लिंगसापेक्ष नाहीत.