'लागत आहे' हेच रूप व्याकरणदृष्ट्या निर्दोष वाटते.

मात्र कवितेत आणि कुणा व्यक्तीच्या तोंडच्या भाषेत 'लागते आहे'  इ. अनेक रूपे पाहायला मिळतात.
येथे 'लागत आहे' हे वृत्ताच्या दृष्टीने बसणार नाही त्यामुळेच कदाचित कवयित्रीला 'लागते आहे' हे रूप वापरावे लागत आहे

कदाचित
नटावे लागते मजला
किंवा
नटावे लागते येथे
किंवा
नटावे लागते जगती

असे काही करून पाहता आले असते मात्र कानाला ते तितके बरे वाटले नसते असे वाटते.